सेंद्रिय शेती अनुदान योजना 2024 : संपूर्ण माहिती मराठी
सेंद्रिय शेती अनुदान योजना 2024 : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत सेंद्रिय शेती कृषी योजना राबवण्यात येते. यामध्ये सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक शेतीचा विकास सजीव पर्यावरणतील रचना आणि जीवन चक्र समजून घेऊन व रासायनिक पद्धतीचा अतिवापर टाळून केलेली शेती म्हणजेच सेंद्रिय शेती होय.
सेंद्रिय शेती योजनांमध्ये शेतातील कीटकनाशकांचा तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यावर भर देण्यात येतो. जेणेकरून जमिनीचा देखील पोत सुधारण्यास मदत होते. सोबतच उत्पादनातील पिकांची प्रत सुधारण्यात मदत होते. यासाठी राज्य सरकार सेंद्रिय शेतीच्या विकासावर भर देत आहे.
सेंद्रिय शेती विकास योजना अमलात आणण्यासाठी राज्य सरकारा मार्फत शेतीविषयक तसेच कृषी विषयक विविध योजनांना एकत्रित करून पुनर्रचना करण्यात आले आहे. जेणेकरून राज्यातील अति दुष्काळी भागात या योजनेचा विकास सहजरित्या झाला पाहिजे. तसेच शेतीवरील पाण्याचे व्यवस्थापन, मृदा आरोग्य आणि पारंपारिक शेती चा देखील या अभियानात समावेश केला जाऊ शकतो.
सेंद्रिय शेती अनुदान योजना 2024 Overview
योजनेचे नाव | सेंद्रिय शेती अनुदान योजना |
सुरू करणार | केंद्र / राज्य सरकार |
विभाग | कृषी मंत्रालय |
लाभार्थी | शेतकरी गट व समूह |
उद्देश | शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करणे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अधिकृत संकेतस्थळ | Maharashtra.gov.in |
सेंद्रिय शेतीचा अनुदान योजनेचा मुख्य उद्देश 2024
सेंद्रिय शेतीचा साध्या शब्दात अर्थ म्हणजे नैसर्गिक शेती असा होतो परंतु तांत्रिक शब्दात सांगायचे झाले तर सेंद्रिय शेती म्हणजे सजीव पर्यावरणीय रचना आणि जीवन चक्र समजून घेऊन व रासायनिक पद्धतीचा अतिवापर टाळून केलेली शेती म्हणजेच सेंद्रिय शेती होय.
- राज्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करणे.
- रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर बंद करणे.
- शेतकऱ्यांच्या मदतीने सेंद्रिय शेती ग्राम विकसित करणे.
- सेंद्रिय शेतीवर आधारित प्रशिक्षण शिबिर आयोजन करून त्यातून प्रबोधन करणे.
- शेतकऱ्यांच्या शेतावर सेंद्रिय शेती निविष्ठा तयार करणे तसेच पुरवठा करणे.
- शेतकऱ्यांचे उत्पादन उत्पादित मालाचे व्यवस्थापन आणि प्रमाणीकरण तसेच विक्री करणे.
- ग्राहकास विषमुक्त उत्पादित पिके उपलब्ध करून देणे.
- शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे.
- शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे.
- शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल व प्रगतीपथावर आणणे हा मुख्य उद्देश.
सेंद्रिय शेती अनुदान योजनांचे वैशिष्ट्य व अंतर्भूत घटक
1). शेतकरी गट निर्मिती करणे शेतकरी गट निर्मिती प्रक्रियेत 50 शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचा गट करून प्रत्येक शेतकऱ्याची एक एकर शेती अशी 50 एकर शेती एकत्र करून या 50 शेतकऱ्यांच्या गटातून एकाची गटनेता म्हणून निवड करणे. जेणेकरून निवडलेला शेतकरी गटातील इतर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती बाबत प्रशिक्षण व इतर शेती विषयक माहिती देईल.
2). उत्पन्नाची हमी/ सहभागी हमी
शेतकऱ्यांच्या गटातील शेतकऱ्यांना उत्पन्नाची प्रामाणिककरणासाठी प्रक्रिया पार पाडली जाते. तसेच संकेतस्थळावर इतर माहिती व्यापारी, विक्रेते, ग्राहक व शेतकरींसाठी उपलब्ध करून दिली जाते या पद्धतीचा वापर करून राज्यातील सेंद्रिय उत्पन्नाचे प्रामाणिकरण करून ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करणे हा उद्देश.
3). एकत्रित खतांचे व्यवस्थापन
सेंद्रिय शेतीमध्ये एकात्मिक खताचे व्यवस्थापनामध्ये जैविक खताचा वापर, स्फुरदयुक्त सेंद्रिय खताचा वापर, गांडूळ खताचा वापर, रायझोबियम तसेच जीवामृत, निंबोळी खत, दशपर्णी अर्क, नीम अर्क इत्यादींचा एकत्रितपणे जास्तीत जास्त क्षेत्रावर सेंद्रिय शेतीमध्ये वापर करणे हा उद्देश.
4). भाडेतत्त्वावर अवजारे घेणे
सेंद्रिय शेती योजनेद्वारे प्रस्तावित अनुदानातच गटातर्फे अवजारे भाड्याने घेण्यासाठी तरतूद केली आहे.
सेंद्रिय शेती अनुदान योजनेच्या मुख्य अटी व पात्रता
- 50 शेतकऱ्यांचा 50 एकराचा गट तयार करणे.
- गटात भाग घेतलेल्या शेतकरी तीन वर्षे योजनेस बांधील राहील.
- रासायनिक खते वापरणार नाही असे प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागेल.
- गटात समाविष्ट होणाऱ्या शेतकऱ्याकडे किमान दोन पशुधन असणे आवश्यक.
- निवड झालेल्या शेतकऱ्यांकडे बँक खाते असणे आवश्यक.
- प्रत्येक शेतकऱ्याने माती व पाणी परीक्षण करणे बंधन कारक राहील.
- कोरडवाहू किंवा बागायती शेतीचा प्रत्येकी स्वतंत्र गट करावा लागेल.
- कोरडवाहू शेतीला प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
- शेतीसाठी सौर ऊर्जा स्वतःचा वापर करणाऱ्या गटात प्राधान्य राहील.
- शेती गट दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे असले पाहिजे.
- महिला शेतकऱ्यांचा गट स्वतंत्र होत असल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल त्यामध्ये महिला बचत गटांचा समावेश करावा.
- योजनेचा कालावधी तीन वर्षाचा आहे त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याला त्यापूर्वी योजनेतून वेगळे होता येणार नाही
सेंद्रिय शेती योजना कागदपत्रे / Documents
सेंद्रिय शेती योजना 2024
- आधार कार्ड
- ओळखपत्र
- राहावासी दाखला
- रेशन कार्ड
- बँक खाते
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट फोटो
- बदला ७/१२ व ८अ
- प्रतिज्ञापत्र
सेंद्रिय शेती योजनेचा लाभ
- उच्च सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण दिले जाईल.
- केंद्रीय सेंद्रिय शेतीचे तंत्रज्ञान
- सेंद्रिय निविष्ठा तयार करणे
- योजनेतून उत्पादित मालाचे वाहतूक भाड्याची तरतूद
- शेतीसाठी लागणारे अवजारे भाड्याने घेणे
- उत्पादित मालाची प्रमाणीकरण करणे
- प्रत्येक गटासाठी भरीव आर्थिक तरतूद
- एका शेतकऱ्याला 1 एकर व जास्तीत जास्त 2.5 एकर लाभ घेता येईल.
सेंद्रिय शेती योजना अनुदान पद्धत
- महाराष्ट्रात सेंद्रिय शेती योजनेला डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत राबविण्यात येते.
- योजनेअंतर्गत विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ या सहां जिल्ह्यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
- सदर योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकरी गटाला तीन वर्ष च्या योजनेच्या कालावधीत 15 लाख रुपये रक्कम देण्यात अनुदान स्वरूपात देण्यात येईल.
- सन 2023-24 साठी 20 कोटी रुपये कृषी आयुक्तालयाने मंजूर केले आहे.
- सदर योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी केंद्र सरकारचे 60% आणि राज्य शासन 40% असेल.
- अनुदानाची पद्धत : प्रथम वर्ष 7.67 लाख रुपये, द्वितीय वर्ष 4.98 लाख रुपये, तृतीय 2.89 लाख रुपये
सेंद्रिय शेती अनुदान योजनेचे मुख्य फायदे
- सेंद्रिय शेती केल्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता वाढते व जमिनीचा पोत सुधारतो.
- रासायनिक खतांवर ची निर्भरता कमी होते व शेतकऱ्यांचा वाढीव खर्च कमी होतो.
- मृदा आरोग्य व जमिनीचे आरोग्य तसेच शेतकऱ्याचे आरोग्य देखील सुधारते.
- विषमुक्त पिकांमुळे ग्राहकाचे आरोग्य सुदृढ राहते.
- यातूनच शेतकऱ्याचे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.
सेंद्रिय शेती अनुदान योजना 2024 अर्ज प्रक्रिया
- सेंद्रिय शेती अनुदान योजना 2024 साठी शेतकरी गटाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.
- अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.
FAQ
1) . सेंद्रिय शेतीची सरकारी योजना काय आहे ? सेंद्रीय गुणवत्तेची अंतर्गत उत्तीर्ण सेंद्रिय शेती करण्यास प्रोत्साहन देणे आणि त्या अनुषंगाने एकत्रित गटशेतीच्या मार्गदर्शन आणि रु.15 लाख अनुदान दिले जाते. |
शासनाच्या इतर योजना पहा
- Free Silai Machine Yojana | मोफत शिलाई मशीन योजना महाराष्ट्र
- Ladli Bahna Yojana | लाडली बेहना योजना 2024