PM Vishwakarma Yojana 2024 | ‘पीएम विश्वकर्मा योजना’ अर्ज पात्रता कागदपत्रे लाभ संपूर्ण माहिती

  PM Vishwakarma Yojana 2024 

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ची सुरुवात प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने पीएम विश्वकर्मा योजनेची सुरुवात झाली. विश्वकर्मा योजना च्या माध्यमातून पारंपारिक पद्धतीने काम करणाऱ्या कारागिरांना त्यांच्या कौशल्याला आणखी धार देण्यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे.

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत सर्व कारागिरांना त्यांच्या वैयक्तिक उपजीविकेच्या कामासाठी रु. 15000 पर्यंत आर्थिक मदत केली जाते. तसेच सर्व कारागीरांना त्यांच्या क्षेत्रात प्रत्येक दिवशी प्रशिक्षण मोफत देण्यात येईल व सोबतच रु. 500 भत्ता दर दिवशी दिले जातील.

Pm Vishwakarma Kaushal Samman Yojana राबवण्याचा मुख्य उद्देश हा या असंघटित क्षेत्राला संघटित करून प्रत्येक कारागीराला कुशल बनवणे.जेणेकरून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आत्मनिर्भर भारत बनवण्याचे स्वप्न पूर्ण होईल.

PM Vishwakarma Yojana काय आहे ?

PM Vishwakarma Yojana द्वारे विश्वकर्मा समुदायातील गरीब व कुशल कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण व तंत्रज्ञानाशी जोडण्याचे काम केले जाते या योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या सरकारी योजनेचा लाभ सर्व क्षेत्रातील कारागिरांना होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून जवळपास 15 कोटी रुपयांचा लाभ या क्षेत्रातील कारागिरांना दिला जाणार आहे.

PM Vishwakarma Yojana 2024 Highlight 

योजनेचे नाव    Pradhan mantri Vishwakarma Yojana
सुरू केली    केंद्र सरकार
हस्ते    प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी
लाभार्थी    विश्वकर्मा नागरिक
लाभ    15000 रु. आर्थिक मदत
अर्ज प्रक्रिया    ऑनलाइन
अधिकृत संकेतस्थळ    pmvishwakarma.gov.in

 

pm vishwakarma loan yojana 2024

PM Vishwakarma Yojana चा मुख्य उद्देश 

पीएम विश्वकर्मा योजना ही केंद्र सरकार तर्फे राबवली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस 17 सप्टेंबर पासुन  या योजनेची सुरुवात झाली.

  • विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून भारतातील छोटे छोटे व कुशल कारागिरांना त्यांच्या क्षेत्रात प्रशिक्षण देऊन तसेच आर्थिक सहाय्यता करणे.
  • सर्व कारागिरांना रुपये 15000 पर्यंत प्रोत्साहन भत्ता तसेच प्रशिक्षण काळात दररोज 500 रुपये देऊन त्यांना नवीन तंत्रज्ञानाशी जोडणे.
  • पीएम विश्वकर्मा योजनेतून जास्तीत जास्त कारागिरांना कुशल बनवणे व बेरोजगारीचा वाढता दर कमी करणे हा मुख्य उद्देश

PM Vishwakarma Yojana 2024 चा लाभ 

  • कारागिरांना रुपये 15000 पर्यंत एक रकमी आर्थिक मदत .
  • प्रत्येक दिवसाला 500 रुपये आर्थिक मदत.
  • Pm Vishwakarma loan Yojana अंतर्गत रुपये 100000 लाखाचे लोन दिले जाईल.
  • कारागिरांना प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र दिले जाईल व सोबतच युनिक ओळखपत्र सुद्धा दिले जाईल.

PM Vishwakarma Yojana चे लाभार्थी 

  • सुतार
  • लोहार
  • मूर्तिकार
  • सोनार
  • कुंभार
  • चर्मकार
  • नाव्ही
  • धोबी
  • टेलर
  • मच्छिमार
  • राजमिस्त्री इ. समाजातील लोक पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत सहभाग नोंदवू शकता.

PM Vishwakarma Yojana 2024 पात्रता 

  • अर्जदार सदर योजनेत समाविष्ट केलेल्या लाभार्थीच्या सूची मधील असावा.
  • पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचे वय कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असले पाहिजे.
  • अर्जदाराने नोंदणीच्या दिवसाला संबंधित उद्योगात गुंतलेले असावे.
  • अर्जदाराने स्वयंरोजगार व व्यवसाय विकासासाठी केंद्र किंवा राज्य सरकारांच्या कुठल्याही योजनेतून समान क्रेडिट आधारावर कर्ज घेतलेले नसावे. उदा. PMEGP, PM Swanidhi , Mudra loan .
  • Vishwakarma Samman Yojana अंतर्गत लाभ घेण्यासाठी कुटुंबातील फक्त एका सदस्यापर्यंत मर्यादित असेल .

PM Vishwakarma Yojana 2024 Documents 

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • बँकेचे पासबुक
  • पासपोर्ट फोटो
  • मोबाईल नंबर

Pm Vishwakarma Yojana चे फायदे 

  • लाभार्थ्याला विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रमाणपत्र व आयडी कार्ड मिळेल.
  • प्रशिक्षणा दरम्यान दिवसाला 500 रुपये मानधन .
  • उद्योगासंबंधीत साधनसामग्री घेण्यासाठी प्रोत्साहित राशी रुपये 15000 दिली जाईल.
  • Pm Vishwakarma loan Yojana अंतर्गत अर्जदाराला 1 लाखापर्यंत
  • कर्ज 18 महिन्यांच्या परतफेडीवर व 2 लाखांचे कर्ज 30 महिन्यांच्या परतफेडीवर 5% व्याज दराने दिले जाईल.
  • योजनेअंतर्गत दर डिजिटल व्यवहारासाठी 1 रु.प्रोत्साहन राशी दिली जाईल.
  • तसेच National committee for marketing अंतर्गत लाभार्थ्याला त्याच्या उद्योगाची फ्री मध्ये जाहिरात करून दिली जाईल.

PM Vishwakarma Yojana online apply 

मित्रांनो जर तुम्ही पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत अर्ज करू इच्छिता तर खाली दिलेल्या अर्ज प्रक्रियेला काळजीपूर्वक फॉलो करा.

  • अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या
  • How to register या ऑप्शनवर क्लिक करा.
  • रजिस्ट्रेशन साठी आधार कार्ड नंबर व मोबाईल नंबर सबमिट करून व्हेरिफिकेशन करा.
  • Pm Vishwakarma registration form ओपन झाल्यावर त्यात
  • विचारली गेलेली सर्व माहिती अचूक भरा.
  • सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • शेवटी submit बटन वर क्लिक करा.

Pm Vishwakarma Loan Yojana Official Website pmvishwakarma.gov.in

FAQ 

1). Pm Vishwakarma Yojana चे अजुन दुुसरे नाव काय ? 

Pm Vishwakaarma Kaushal Samman Yojana           

 

शासनाच्या इतर योजना पहा

1) Free Silai Machine Yojana 2024 | फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र
2) Ladli Behana Yojana Maharashtra | लाडली बेहना योजना 2024                                                  3) सेंद्रिय शेती अनुदान योजना 2024

Leave a comment