Pm Suryoday Yojana Online Apply | 1 करोड कुटुंबांना मिळणार फ्री सोलर पॅनल

Pm suryoday Yojana Online Apply For 2024

Pm suryoday Yojana Online Apply 2024 : मित्रांनो लोकसभेची निवडणूक आता संपली असून निकाल देखील लागला आहे. त्यापूर्वी प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी एक नवीन योजना “पीएम सूर्योदय योजना” सुरू करण्याचे जाहीर केले होते. या योजनेअंतर्गत वाढत्या तापमानाचा फायदा घेऊन वाढते लाईट बिलाची समस्या दूर करण्याचा मानस मोदी सरकारने केला आहे. त्या अंतर्गत देशातील 1 करोड पेक्षाही अधिक लोकांना या योजनेचा लाभ होणार आहे. मित्रहो प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्या माध्यमातून देशातील एक करोड कुटुंबांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवले जाणार आहे.
मित्रहो अशा महत्त्वाच्या आणि फायद्याच्या योजनांचा लाभ घ्यायलाच हवा. योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री सूर्योदय योजने संबंधित संपूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये देत आहोत त्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 Key Point

   योजनेचे नाव  Pm suryoday Yojana Online Apply 2024
   सुरू केली     केंद्र सरकार
   लाभार्थी     भारताचे नागरिक
   वर्ष     2024
   उद्देश्य     सोलर पॅनलचे वितरण
   अर्ज प्रक्रिया     ऑनलाईन
   अधिकृत संकेतस्थळ     https://www.pmsuryaghar.gov.in/

प्रधानमंत्री सूर्योदय योजना काय आहे ?

प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिर चे उद्घाटन केले व प्राणप्रतिष्ठा आटोपुन परत आल्यानंतर राम मंदिर च्या भव्य मंदिराचे उद्घाटन बद्दल देशातील जनतेला प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्या स्वरूपात भेट म्हणून दिली ही योजना देशातील गरीब तसेच ज्या गावांमध्ये इलेक्ट्रिसिटी ची समस्या आहे, तसेच ज्या कुटुंबाचे लाईट बिल जास्त येते अशा नागरिकांसाठी परवणीच म्हणावे लागेल. वाढते विजेचे बिल कमी करण्यासाठी तसेच वाढणाऱ्या विजेचा तुटवडा कमी करण्यासाठी एक करोड नागरिकांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावण्याचे लक्ष मोदी सरकारने हाती घेतले आहे.

Pm Suryoday Yojana Online Apply 2024

 

 Mukhyamantri Rajshri Yojana”

या योजनेअंतर्गत नागरिकांच्या वाढत्या विजेचे बिल कमी करण्यासाठी व नागरिकांच्या घरावर सोलर पॅनल लावले जाणार  त्यामुळे त्यांच्या लाईट बिल मध्ये कमतरता येईल. सोबतच सरकार सोलर पॅनल लावण्यासाठी सबसिडी सुद्धा देणार आहे.

Pm Suryoday Yojana चा उद्देश

पीएम सूर्योदय योजना ही Ministry of New And Renewable Energy मार्फत राबविण्यात येत आहे. भारतात दरवर्षी उन्हाळा या ऋतूत तर हिवाळ्याच्या दिवसात सुद्धा ऊन तापत असते. याचाच फायदा घेण्यासाठी पीएम सूर्योदय योजने ची सुरुवात केली आहे. जेणेकरून वाढत्या विजेची मागणी मध्ये कमतरता व वाढत्या विजेच्या बिलापासून गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांची सुटका असे दोघेही उद्देश डोळ्यासमोर ठेवून श्री. नरेंद्र मोदी यांनी पीएम सूर्योदय योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेचा फायदा फक्त शहरी भागातील लोकांनाच नाही तर ग्रामीण भागातील लोकांना सुद्धा होणार आहे.

Pm Suryoday Yojana Online Apply Benefits 

  1. पीएम सूर्योदय योजनेअंतर्गत देशातील 1 करोड गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवले जातील.
  2. या योजनेअंतर्गत वाढते लाईट बिल कमी करण्यास मदत मिळेल.
  3. पीएम सूर्योदय योजनेची लाभ देशातील एक करोड गरीब व मध्यमवर्ग कुटुंबांना घेता येणार आहे.
  4. प्रधानमंत्री सूर्योदय योजना मार्फत गरीब व मध्यमवर्गीय व ज्या गावांमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अजून सुद्धा वीज पोहोचली नाही अशा लोकांपर्यंत वीज पोहोचवली व देशाला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यास मदत मिळेल.

Pm Suryoday Yojana Online Apply करिता पात्रता

मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला सरकारने घालून दिलेली नियम व पात्रतेचे पालन करावे लागणार आहे.

  1. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
  2. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबाच्या गटात मोडले गेले पाहिजे जेणेकरून तुम्हाला योजनेचा फायदा लवकर मिळेल.
  3. या योजनेमध्ये सहभागी व योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःचे घर असणे आवश्यक आहे.
  4. Suryoday Yojana साठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे अर्जदाराला बंधनकारक राहील.

Pm Suryoday Yojana Online Apply करिता आवश्यक कागदपत्रे

अर्जदार पीएम सूर्योदय योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र असेल तर खालील दिलेल्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक राहील.

  1. आधार कार्ड
  2. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  3. रहिवासी दाखला
  4. रेशन कार्ड
  5. विजेचे बिल
  6. पासपोर्ट साईज फोटो
  7. मोबाईल नंबर
  8. बँकेचे पासबुक

Pm suryoday Yojana Online Apply 2024 Procedure 

  1. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला national portal for rooftop solar च्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
  2. वेबसाईटवर आल्यानंतर Apply for Rooftop Solar या ऑप्शन वर क्लिक करा.
  3. सिलेक्ट स्टेट मध्ये महाराष्ट्र स्टेट करा व विजेच्या बिला मधील कस्टमर नंबर टाका.
  4. लगेच पीएम सूर्योदय योजनेचा अर्ज भरण्यासाठी फॉर्म ओपन झालेला दिसेल.
  5. अर्जामध्ये तुमची संपूर्ण खरी माहिती भरा व आवश्यक असलेले कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  6. फॉर्म भरून झाल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा.
Pm suryoday Yojana Online Apply साठी खालील अधिकृत संकेतस्थळला भेट द्या  https://www.pmsuryaghar.gov.in/

FAQ

1). प्रधानमंत्री सूर्योदय योजना काय आहे ?
पीएम सूर्योदय योजना ही देशातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांच्या वाढत्या विजेच्या बिलापासून सुटका करण्यासाठी नागरीकांना त्यांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी भारत सरकार सब्सिडी देऊन मदत करणार आहे.

2). प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ कोणाला मिळणार ?
पीएम सूर्योदय योजनेचा देशातील एक करोड गरीब व मध्यमवर्गीय परिवारांना मिळणार आहे.

3). Pradhanmantri Suryoday Yojana Online Apply कुठे करावे ?
लवकरच केंद्र सरकार व ऊर्जा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने योजनेचा अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन पोर्टल चालू करणार आहे.

Leave a comment