Pm Mudra Loan Yojana मित्रांनो भारत सरकार द्वारे राबवल्या जाणाऱ्या मुद्रा लोन योजनेद्वारे देशातील सर्व नागरिकांसाठी त्यांच्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन योजना सुरू करण्यात आलेली आहे तिचे नाव प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना आहे. या योजनेची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती. Pm Mudra Loan Yojana अंतर्गत जे कोणी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु त्यांच्याकडे भांडवल नाही अशा अर्जदारांना व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच चालू असलेला व्यवसाय वाढवण्यासाठी पीएम मुद्रा लोन योजना च्या माध्यमातून 50,000 रुपये ते 10 लाख रुपयापर्यंत पीएम मुद्रा लोन योजना सुरू करण्यात आलेली आहे.
मित्रांनो पीएम मुद्रा लोन योजना फक्त काही ठराविक अटी सोबत लागू करण्यात आलेली आहे. जेणेकरून जास्तीत जास्त नवीन उद्योजक तयार होतील.. आणि बेरोजगार नवयुवक तरुणांना एक दिशा मिळेल जे स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिता त्यांच्यासाठी ही योजना एक पर्वणीच म्हणावी लागेल.
मित्रांनो पीएम मुद्रा लोन योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्व माहिती आपल्याला या आर्टिकल मध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत लाभार्थीला किती लोन मिळेल आणि किती वर्षासाठी मिळेल तसेच योजनेसाठी अर्ज कसा करावा कोठे करावा. याबद्दल सर्व माहिती आपण या हॉटेलमध्ये दिलेली आहे. त्यासाठी तुम्ही हा लेख संपूर्ण काळजीपूर्वक वाचा.
Pm Mudra Loan Yojana काय आहे ?
प्रधानमंत्री मुद्रा योजना PMMY ही योजना भारत सरकारची प्रमुख योजना आहे या योजनेअंतर्गत कर्जाचे सुविधा नवीन उद्योजकांसाठी देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय तसेच शेतीशी निगडित प्रकल्पांचे उत्पादन व्यापार किंवा सेवा क्षेत्रात गुंतलेल्या बिगर शेती क्षेत्रात गुंतलेल्या सूक्ष्म उद्योगांसाठी दहा लाखापर्यंत कर्ज या योजनेअंतर्गत देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सूक्ष्म आणि लघु संस्थान मधील लाखो मालकी हक्कातील तसेच भागीदारी गटांचा समावेश आहे. सेवा क्षेत्रातील युनिट्स, दुकानदार, फळे विक्रेते, भाजीपाला विक्रेते, ट्रक ऑपरेटर, सेवा म्हणजेच मेस चालवणारे, दुरुस्ती दुकाने, छोटे उद्योग चालवणारे कारागीर या योजनेअंतर्गत कर्जासाठी पात्र राहणार आहेत.
Pm Mudra Loan Yojana Benefits
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत योजनेचे वर्गीकरण तीन श्रेणीमध्ये करण्यात आले आहे. ज्यामध्ये शिशु ,किशोर आणि तरुण अशा तीन श्रेणीमध्ये करण्यात आले आहे. जेणेकरून लाभार्थींसाठी सूक्ष्म युनिट तसेच उद्योगांच्या वाढीचा टप्पा आणि उद्योजकांचा विकासाचा टप्पा या वर्गीकरणांमध्ये निधीच्या गरजा दर्शविल्या आहेत.
शिशु श्रेणीतील उद्योजकांसाठी 50,000 रुपये पर्यंतचे कर्ज कव्हर देण्यात येत आहे.
किशोर श्रेणीतील उद्योजकांसाठी
50,000 ते 5,00,000 पर्यंतचे कर्ज कव्हर देण्यात येत आहे.
तरुण श्रेणीतील उद्योजकांसाठी
5,00,000 ते 20,00,000 पर्यंतचे कर्ज कव्हरींग देण्यात येत आहे.
Pm Mudra Loan Yojana Highlight
योजनेचे नाव | प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना |
सुरू केली | भारत सरकार |
योजनेची सुरुवात | 8 एप्रिल 2015 |
लाभार्थी | छोटे व्यवसायिक |
लाभ | 50 हजार ते 20 लाख रुपयापर्यंत |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.mudra.org.in |
येथे क्लिक करा
Pm Mudra Loan Yojana Eligibility
- अर्जदाराकडे आवश्यक कौशल्य अनुभव असणे आवश्यक असू शकते. जेणेकरून प्रस्तावित प्रकल्पाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अर्जदार योग्य आहे किंवा नाही.
- अर्जदार कुठल्याही बँकेचा किंवा वित्तीय संस्थेचा ब्लॅक लिस्टेड किंवा डिफॉल्टर नसावा.
- अर्जदाराचा क्रेडिट ट्रॅक रेकॉर्ड समाधानकारक असावा.
- ज्या उद्योगांसाठी शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता असेल अशा प्रस्तावित प्रकल्पांच्या तरतुदीसाठी आवश्यकतेनुसार मूल्यांकन केले जाईल.
वैयक्तिक |
मालकीची हक्क |
भागीदारी फॉर्म |
प्रायव्हेट लिमिटेड कंपनी |
सार्वजनिक कंपनी |
या उद्योगांसाठी मुद्रा येऊन योजना सुरू करण्यात आलेली आहे.
Pm Mudra Loan Yojana Documents :-
शिशु कर्जासाठी :-
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी दाखला
- विज बिल किंवा घरपट्टी पावती
- बँक पासबुक किंवा बँक स्टेटमेंट उद्योग यंत्रसामग्रीचे कोटेशन सप्लायर चे नाव नाव व पत्ता
किशोर आणि तरुण कर्जासाठी :-
- आधार कार्ड,
- पॅन कार्ड,
- पासपोर्ट साईज फोटो,
- विज बिल,
- घरपट्टी पावती,
- मतदार ओळखपत्र,
- अर्जदार डिफॉल्टर नसल्याचे खात्याचे स्टेटमेंट ,
- आयकर भरल्याचे विवरण पत्र .
- अर्ज सादर केल्याच्या तारखेपर्यंत चालू आर्थिक वर्षात केलेली विक्री.
Pm Mudra Loan Yojana Apply Online Process
- सर्वप्रथम प्रधानमंत्री मुद्रा योजनाच्या अधिकृत वेबसाईट वरचा आणि त्यानंतर Udymi Mitra पोर्टल ऑप्शन निवडा.
- त्यानंतर Apply Now या ऑप्शनवर क्लिक करा.
- नवीन पेज ओपन झाल्यावर new entrepreneur/existing entrepreneur/self employed professional पैकी एक निवडा.
- आता अर्जदाराचे नाव अर्जदाराचा ईमेल आयडी आणि अर्जदाराचा मोबाईल नंबर टाका आणि जनरेट ओटीपी या ऑप्शनवर क्लिक करा आणि रजिस्टर करा.
रजिस्ट्रेशन झाल्यानंतर
- अर्जदाराची वैयक्तिक माहिती आणि व्यवसायिक माहिती भरा.
- त्यानंतर Loan Application Centre वर क्लिक करा Apply म्हणा.
- मुद्रा लोन योजनेमध्ये आवश्यक कर्जाच्या शिशु,किशोर,तरुण श्रेणीतील आवश्यक श्रेणी निवडा.
- त्यानंतर अर्जदाराच्या व्यवसायाची माहिती जसे की व्यवसायाचे नाव उद्योगाचा प्रकार निवडणे सेवा व्यापार शेतीशी संबंधित सेवा विषयी माहिती भरणे आवश्यक आहे.
- व्यवसायाच्या मालकाचे तपशील तसेच विद्यमान बँकिंग सुविधा प्रस्तावित क्रेडिट सुविधा भविष्यातील अंदाज आणि प्राधान्य कर्जदार भरणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.
- एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर एक अर्ज क्रमांक तयार होतो तो भविष्यातील संदर्भ साठी अर्जदाराने आपल्या जवळ ठेवणे आवश्यक आहे.
FAQ
1.प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत शिशु लोन प्रस्ताव किती दिवसात मंजूर करण्यात होतो ? आरबीआय ने स्थापन केलेल्या बँकिंग कोर्स आणि स्टॅंडर्ड बोर्ड ऑफ इंडिया यांच्यानुसार रुपये पाच लाख पर्यंतच्या क्रेडिट मर्यादेसाठी जे जे कर्ज दोन आठवड्यांच्या हात निकाली काढले जावेत अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. |
2.प्रधानमंत्री मुद्रा लोन कर्जअंतर्गत खादी उद्योग प्रकल्प पात्र आहे का ? हो खादी उद्योग प्रकल्प पात्र आहे. |