Namo Shetkari Yojana | महाराष्ट्र सरकार देणार शेतकऱ्यांना 12000 रुपये

Namo Shetkari Yojana 2024 : मित्रांनो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी मोठीखुशखबर आली आहे.नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक 6000 रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सम्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार कडून मिळणाऱ्या वार्षिक 6000 रुपया सोबतच महाराष्ट्र सरकार कडून सुद्धा 6000 रुपये शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.असे एकूण 12000 रुपये शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.

Namo Shetkari Yojana Maharashtra Key Point

         योजनेचे नांव   नमो शेतकरी योजना 2024
         सुरू केली   महाराष्ट्र शासन
         लाभार्थी   महाराष्ट्रतील शेतकरी
         लाभ   6000 रुपये
         अर्ज प्रक्रिया   ऑनलाईन
          Website   www.nsmny.mahait.org

Namo Shetkari Yojana काय आहे ?

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या धोरणानुसार शेतकऱ्यांसाठी मे 2023 मध्ये नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान थेट बँक खात्यात जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपयाचे तीन हप्त्यांत वाटप करण्यात येणार आहे. हे हफ्ते शेतकऱ्यांना pm kisan samman nidhi yojana च्या आधी मिळतील.अशा पद्धतीने केंद्र सरकार 6000 रु. महाराष्ट्र सरकार तर्फे 6000 रु. शेतकऱ्यांना मिळणार आहे.

pm-kisan-sanman-nidhi-yojana.
भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे भारतात अधिक शेतकरी चे आर्थिक जीवनमान उंचावण्याच्या हेतूने भारत सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना चालू केली आहे. आतापर्यंत भारतात पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 17 हफ्त्यांचे वाटप झालेले आहे. नमो शेतकरी योजना राबवणारा महाराष्ट्र हा एकमेव राज्य आहे. जिथे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेसोबत अतिरिक्त सहा हजार रुपये दिले जातात.

नमो शेतकरी योजनेसाठी पात्रता

  1. अर्जदार महाराष्ट्राचा स्थायी निवासी असणे आवश्यक.
  2. अर्ज दाराकडे स्वतःची शेती असणे आवश्यक.
  3. अर्ज शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सदस्य असला पाहिजे.
  4. अर्जदार शेतकरी उन्नत गटात मोडत नसला पाहिजे.
  5. अर्जदार शेतकऱ्यांचे बँकेचे खाते आधार कार्ड ला लिंक असणे आवश्यक आहे.
“Mukhyamantri Rajshri Yojana”

Namo Shetkari Yojana Document

  1. आधार कार्ड
  2. रहिवासी प्रमाणपत्र
  3. उत्पन्नाचा दाखला
  4. बँकेचे पासबुक
  5. शेतीचा सातबारा उतारा
  6. 8अ
  7. फेरफार
  8. रेशन कार्ड
  9. पीएम किसान रजिस्ट्रेशन नंबर
  10. मोबाईल नंबर
  11. पासपोर्ट साईज फोटो

Namo Shetkari Yojana चे फायदे  

  1. नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000/- रुपयांच्या अनुदान महाराष्ट्र सरकार देणार आहे.
  2. ही योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.
  3. महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य आहे, ज्याने पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू केली आहे.
  4. याचा फायदा फक्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.
  5. एकाच वेळेस दोन योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे.
  6. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळेल.
  7. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनाही योजनांची व संजीवनी म्हणूनच लाभली आहे असे म्हणावे लागेल

Namo Shetkari Yojana Online Apply

नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना pm kisan samman nidhi yojana चा सदस्य असणे आवश्यक आहे.
अर्जदार शेतकऱ्यांने पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून अनुदान घेतलेले पाहिजे.
नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्रातील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सदस्यांना मिळणार आहे. त्यासाठी कुठलाही नवीन अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

Namo Shetkari Yojana Installments Date

Namo Shetkari Yojana 1st Installment Date   23 October 2023
Namo Shetkari Yojana 2nd Installment Date   28 February 2024
Namo Shetkari Yojana 3rd Installment Date       June/July 2024

Namo Shetkari Yojana Beneficiary Status list check

pm-kisan-beneficiary-list-check

  1. Namo Shetkari Yojana status list बघण्यासाठी शेतकऱ्यांना namo shetkari yojana website वर जावे लागेल.
  2. ज्याप्रमाणे पीएम किसान सम्मान निधी योजनेचे status check केलेजाते, त्याचप्रमाणे लाभार्थी सुची या ऑप्शनवर क्लिक करा.

    pm-kisan-status-maharshtra

  3. नवीन पेज वर State, District , Block, गावाचे नाव सिलेक्ट करा.
  4. शेवटी सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून Beneficiary List Check करा     namo shetkari yojana
  5. आणि Beneficiary Status Check करण्यासाठी नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
  6. Beneficiary Status या ऑप्शनवर क्लिक करा.
  7. तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकुन व कॅपचा कोड व मोबाईल नंबर वर आलेला OTP टाकून Check करा.
Namo Shetkari Sanman Niddhi Yojana 2024  साठी खालील अधिकृत संकेतस्थळला भेट द्या. https://nsmny.mahait.org/

FAQ 

1). नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेअंतर्गत किती अनुदान दिली जाणार आहे ?
नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये अनुदान दिले जाणार आहे.
2). नमो शेतकरी योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?
जे शेतकरी पीएम किसान सम्मान निधी योजनेचे सदस्य आहेत अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेसाठी नव्याने अर्ज प्रक्रिया करण्याची गरज नाही.
3). नमो शेतकरी योजनेचा लाभ कोणत्या महिन्यात मिळेल ?
Namo Shetkari Yojana Installments Time  हा एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर, डिसेंबर ते मार्च असा असणार आहे.

 

Leave a comment