Mukhyamantri Free Yuva Apprenticeship Yojana 2024 | महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा अप्रेंटिसशिप योजना 2024

Mukhyamantri Free Yuva Apprenticeship Yojana

मित्रांनो वाढत्या बेरोजगारीवर व प्रचंड स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करणे व शैक्षणिक योग्यता असल्यावर सुद्धा रोजगार मिळणे अवघड झाले आहे. त्यांना रोजगार मिळत नाही याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकार ने राज्यातील युवकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे त्या योजनेचे नाव Mukhymantri Free Yuva Apprenticeship Yojana आहे. या योजनेची घोषणा महाराष्ट्र विधानसभेत राज्याचे अर्थमंत्री मा.ना.श्री. अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली आहे.
मुख्यमंत्री युवा अप्रेंटिसशिप योजना अंतर्गत युवकांना व्यवसायिक प्रशिक्षण व कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. मित्रांनो मुख्यमंत्री युवा अप्रेंटिसशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला हे आर्टिकल संपूर्ण काळजीपूर्वक वाचावे लागेल जेणेकरून योजनेसंबंधी संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल.

महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा अप्रेंटिसशिप योजना काय आहे ?

Mukhyamantri Free Yuva Apprenticeship Yojana  महाराष्ट्र सरकारने वर्ष 2024-25 च्या अर्थसंकल्पात सुरू करण्याची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत युवकांना विनामूल्य व्यवसायिक तसेच कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या युवकांना कुठलीही फी देण्याची गरज नाही किंबहुना, सरकार युवकांना प्रशिक्षण कालावधी दरम्यान बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6000 रुपये, पदविका धारक विद्यार्थ्यांना 8000 रुपये आणि पदवीधर युवकांना 10000 रुपये दरमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री युवा अप्रेंटिसशिप योजनेअंतर्गत युवकांना व्यवहारिक तसेच कौशल्य वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा अभिनव उपक्रम आहे. जेणेकरून तरुणांना रोजगार उद्योजकाला कुशल मनुष्य मिळण्यास मदत होणार आहे. या योजनेअंतर्गत 10 लाख युवकांना प्रशिक्षित केले जाईल.

Mukhyamantri Free Yuva Apprenticeship Yojana Highlight 

 योजनेचे नाव Mukhyamantri Free Yuva Apprenticeship Yojana 2024
 सुरू केली  महाराष्ट्र सरकार
 उद्देश्य  युवकांना कौशल्य प्रशिक्षण
 लाभार्थी  युवक बारावी ते पदवीधारक विद्यार्थी
 लाभ  6000 ते 10,000 रुपये
 अर्ज प्रक्रिया  ऑनलाइन ऑफलाईन
 अधिकृत स्थळ   https://rojgar.mahaswayam.gov.in

Amrut Free Typing and Shorthand Course Yojana 

Mukhyamantri Free Yuva Apprenticeship Yojana उद्देश्य

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा अप्रेंटिसशिप योजना CMYKPY हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या योजनेचा मुख्य उद्देश युवकांना कौशल्यपूर्ण बनवणे, रोजगार क्षमता वाढवणे, उद्योजकांना कुशल मनुष्यबळ निर्माण करणे हा आहे. जेणेकरून त्यांचे आर्थिक सशक्तीकरण होण्यास मदत होईल व युवक आत्मनिर्भर होतील.

Mukhyamantri Free Yuva Apprenticeship Yojana चे वैशिष्ट्य

  1. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री युवा अप्रेंटीशीप योजनेअंतर्गत युवकांना कौशल्य प्रशिक्षण आणि व्यवहारिक कार्य प्रशिक्षण दिले जाईल.
  2. योजनेचा मुख्य उद्देश युवकांना रोजगारासाठी तयार करणे.
  3. या योजनेअंतर्गत दरवर्षी दहा लाख युवकांना निशुल्क प्रशिक्षण दिले जाणार आहे.
  4. प्रत्येक सहभागी होणाऱ्या युवकाला योजनेअंतर्गत दरमहा विद्यावेतन पात्रतेनुसार दिले जाणार आहे.
  5. जेणेकरून प्रशिक्षण काळात त्यांच्यावर कुठलाही आर्थिक भार पडणार नाही.
  6. युवकांना आत्मनिर्भर बनवणे जेणेकरून ते स्वतःचे व कुटुंबाचे पालनपोषण करू शकतील.

मुख्यमंत्री युवा अप्रेंटीशीप योजना Eligibilty 

मुख्यमंत्री युवा अप्रेंटीशीप योजना मध्ये सहभागी होण्यासाठी व योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पात्रता खालील प्रमाणे आहेत.

  1.  अर्जदार महाराष्ट्र राज्याचा निवासी असावा.
  2. अर्जदाराचे वय 21 वर्षापेक्षा अधिक असावे.
  3. अर्जदार युवा हा बारावी पास,पदवीधारक,पदविका धारक असला पाहिजे.
  4. अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

Mukhyamantri Free Yuva Apprenticeship Yojana Documents

  1. आधार कार्ड
  2. रहिवासी दाखला
  3. बारावी उत्तीर्ण साठी मार्कशीट
  4. पदवीधारक साठी पदवी प्रमाणपत्र
  5. बँक खाते पासबुक
  6. पासपोर्ट साईज फोटो
  7. मोबाईल नंबर

 

Mukhyamantri Free Yuva Apprenticeship Yojana Apply Online

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री श्री. अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री युवा अप्रेंटीशीप योजनेची घोषणा केली होती. योजनेअंतर्गत बेरोजगार युवकांना निशुल्क व्यवसायिक आणि कौशल प्रशिक्षण दिले जाईल. जेणेकरून ते आजच्या स्पर्धेच्या युगात रोजगार मिळवू शकतील तसेच रोजगार निर्माण करू शकतील.
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी युवकांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. मित्रांनो मुख्यमंत्री युवा अप्रेंटिसशिप योजनेची सध्या घोषणा केली गेली असली तरी अजून लागू केली गेलेली नाही. योजनेत अर्ज करण्यासाठी कुठली अधिकारीक संकेतस्थळ सरकारने सुरू केलेले नाही. तरी कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका.

FAQ

1). मुख्यमंत्री युवा अप्रेंटिसशिप योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ?
मुख्यमंत्री युवा अप्रेंटिसशिप योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील युवकांना घेता येईल.
2). मुख्यमंत्री युवा अप्रेंटिसशिप योजने अंतर्गत दरवर्षी किती युवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे ?
Mukhyamantri Free Yuva Apprenticeship Yojana अंतर्गत दरवर्षी 10 लाख युवकांना प्रशिक्षित केले जाणार आहे.
3).Mukhymantri Free Yuva Apprenticeship Yojana अंतर्गत युवकांना किती विद्यावेतन दिले जाणार आहे?
Mukhymantri Yuva Apprenticeship Yojana अंतर्गत 6000 ते 10,000 रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.
4).Mukhymantri Free Yuva Apprenticeship Yojana ची सुरुवात कधी झाली ?                    Mukhyamantri Free Yuva Apprenticeship Yojana ची घोषणा महाराष्ट्र विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना केली होती. प्रत्यक्षात मात्र अजून लागू झालेली नाही.

Leave a comment