Ladli Behna Yojana in Maharashtra 2024
महिला सुरक्षा हा नेहमीच राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार यांच्या कळीचा मुद्दा बनलेला असतो. याच मुद्द्याला अनुसरून महिला सक्षमीकरण व आर्थिक सशक्तीकरण करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने लाडली बहना योजना लागू केली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातही ही योजना लागू होऊ शकते.
या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा मूळ उद्देश महिलांना सक्षम बनवणे असा आहे. लाडली बहना योजना अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500-/ रुपये आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. अशाप्रकारे वार्षिक 18000-/ रुपये या योजनेतून महिलांना मिळणार आहे.
मुख्यमंत्री लाडली बहना योजनेची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. chief minister ladli behna yojana in Maharashtra साठी फॉर्म कुठे भरायचा ? कसा भरायचा ? लाडली बहिणा योजनेची उद्दिष्ट काय ? योजनेचा फायदा काय ? लाडली बहना योजनेचा संपूर्ण तपशील खाली नमूद केलेला आहे.
लाडली बहना योजना काय आहे ?
लाडली बहना योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महिला कल्याणकारी योजना आहे जे की 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा आर्थिक मदत देऊ करते.
लाडली बहना योजनेची उद्दिष्टे
- लाडली बहना योजनेचा मूळ उद्देश गरीब दिन दुबळ्या महिलांना आर्थिक आणि सामाजिक सक्षम बनविणे असा आहे.
- महिलांना आर्थिक स्वरूपात स्वावलंबी बनविणे जेणेकरून महिलांना कुटुंबात निर्णय घेण्याची प्रभावी भूमिका बजावता येईल.
लाडली बहना योजनेचे फायदे
- महिलांना आर्थिक मदत पुरवून त्यांना आत्मनिर्भर बनवण्यास प्रोत्साहन मिळेल व यातूनच मुलींचे साक्षरतेचे प्रमाण वाढेल.
- लाडली बहना योजनेमार्फत गर्भवती महिलांना आणि लहान मुलांना पोषण आहारात आर्थिक मदत होते. विधवा आणि अपंग महिलांना आर्थिक मदत होईल.
- गरिबी निर्मूलनात देखील लाडली बहना योजनेचा फायदा होईल व यातूनच राज्याच्या महिलांचा सर्वांगीण विकास,महिलांचे शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक सुरक्षा प्रदान करणे शक्य होईल.
Ladli Behna Yojana Eligiblity | लाडली बहना योजना पात्रता
- Ladli bahana Yojana in Maharashtra लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे निवासी असणे आवश्यक आहे.
- सदर महिला विवाहित असणे आवश्यक आहे आहे ज्यात विधवा व घटस्फोटीत महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- लाडली बहना योजनेसाठी वयोमर्यादा 21 ते 50 वर्ष आहे.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे.
- कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी नसावा.
- अर्जदार महिला व कुटुंबाकडे पाच एकरापेक्षा जास्त शेती नसावी.
‘फ्री’ शिलाई मशीन योजना महाराष्ट्र
लाडली बहना योजनेसाठी अपात्रतेचे निकष
- अर्जदार महिला किंवा परिवारातील कुठल्याही सदस्याचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक असेल
- अर्जदार महिला किंवा कुटुंबातील सदस्य हा करदाता असेल
- अर्जदार महिला किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही विभाग स्थानिक संस्थेमध्ये नियमित किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्य करत असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत असेल
- अर्जदार महिला भारत सरकारच्या कोणत्या योजनेअंतर्गत दरमहा रुपये बाराशे 50 किंवा त्याहून अधिक रक्कम प्राप्त करत असेल
- अर्जदार स्वतः किंवा कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी लोकसभा किंवा विधानसभेचा सदस्य असेल तर
- अर्जदार स्वतः किंवा कुटुंबातील सदस्य मिळून पाच एकर शेतजमिनीपेक्षा जास्त जमिनीचा मालक असेल
- अर्जदार व कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत चारचाकी वाहन असेल असा असा अर्जदार ladli bahan Yojana साठी अपात्र असेल
Ladli Behna Yojana List of Documents
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- रहिवाशी दाखला
- विवाह प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला/प्रमाणपत्र
- Bank passbook
- जात प्रमाणपत्र
- पासपोर्ट फोटो
- मोबाईल नंबर
Ladli Behna Yojana Apply & Registration
- ladli behna yojana mp चा फॉर्म भरण्यासाठी अर्जदाराला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी माहिती फॉर्म भरण्याची सुविधा ग्रामपंचायती किंवा अंगणवाडी केंद्रात उपलब्ध असते.
- सर्वप्रथम तुमचा आधार नंबर बँक खात्याशी लिंक आहे किंवा नाही हे तपासा जर आधार नंबर बँक खात्याशी लिंक नसेल तर ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.
- Maharashtra ladli behna yojana साठी Online पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ज्यामध्ये तुमचे आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक खात्याचे तपशील व तुमचा पासपोर्ट फोटो या कागदपत्रांचा समावेश आहे.
- अर्जदार महिला अर्ज भरण्याच्या वेळी स्वतः उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा फोटो काढता येईल आणि ई- केवायसी करता येईल
- मित्रांनो अर्ज करण्यासाठी online पद्धतीने Ladli Bahana Yojana Form भरा.
- अर्जदाराने भरलेला फॉर्म प्रशासनाने नियुक्त केलेल्या कॅम्प प्रभारी द्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल व लाभार्थ्याला अर्जाची पोचपावती दिली जाईल. ही पोचपावती SMS/WhatsApp द्वारे देखील मिळेल.
- या पोचपावती सहाय्याने अर्ज मंजूर झाल्यानंतर लाडली बहना योजना अर्ज स्थिती 2024 तपासा.
- अर्ज मंजूर झाल्यानंतर अर्जदार महिलेचे नाव लाडली बहना योजना 2024 यादीमध्ये येईल व प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला थेट बँक खात्यात आर्थिक मदत मिळायाला सुरुवात होईल.
Ladli Behna Yojana in Maharashtra 2024 Highlight
योजनेचे नाव | लाडली बहना योजना |
सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी | बेरोजगार/गरीब विवाहित महिला |
लाभ | आर्थिक मदत |
उद्देश | महिला सक्षमीकरण |
धनराशी | 1500-/ रुपये प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | Nari Shakti Doot App |
FAQ
1) लाडली बहना योजनेसाठी कोण पात्र आहेत? या योजनेअंतर्गत सर्व विवाहित 21 ते 60 वयोगटातील महिला ज्यांचे उत्पन्न वार्षिक अडीच लाखापेक्षा कमी आहे. |
2) लाडली बहना योजनेत मी माझे नाव कसे तपासू शकते ? लाडली बहना योजना नोंदणी स्थिती 2024 तपासण्यासाठी तुम्हाला @cmladlibahana.mp.gov.in या संकेतस्थळावर चेक करू शकता. |
3) लाडली बहना योजनेचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा? मित्रांनो ही योजना मध्यप्रदेश सरकारची असल्याने तुम्हाला मध्य प्रदेश सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच @cmladlibahana.mp.gov.in वर अर्ज करू शकता. |
1 thought on “‘लाडली बहना योजना’ लाडक्या बहिणीला 1 हजार रूपये मानधन : Ladli Behna Yojana”