dr. babasaheb ambedkar swavalamban yojana 2024 | डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2024 | शेतकऱ्यांना रु. 250000 लाखाचे अनुदान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2024 | dr. babasaheb ambedkar swavalamban yojana | dr babasaheb ambedkar yojana 2024 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना काय आहे ?

अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसाहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश्य काय ? अर्ज कुठे करावा ? या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण या लेखात पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला संपूर्ण लेख लक्षपूर्वक वाचावा लागेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना उद्देश, फायदे, नोंदणी प्रक्रिया, पात्रता तसेच योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करणे कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकार सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देणार आहे. आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला या योजने संबंधित आवश्यक कागदपत्रे फायदे महत्त्वाच्या तारखा, नोंदणी प्रक्रिया, वापर करता मार्गदर्शक तत्वे आणि अधिकृत वेबसाईटचे मुख्य माहिती प्रदान करू तर चला आपण या योजने संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना Highlights

  योजनेचे नाव   डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
  व्दारे सुरू   महाराष्ट्र सरकार
  लाभार्थी   अनुसूचित जाती/नवबौद्ध
  लाभ   250000/- रु.
  उद्देश  अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात   वाढ करून जीवनमान उंचावणे
 अर्ज प्रक्रिया  ऑनलाइन/ऑफलाइन
अधिकृत संकेतस्थळ  www.agriwell.mahaonline.gov.in

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनाचा उद्देश 

अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अशा शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्य देण्याची राबवण्यात येत असलेली अनुसूचित जाती उपाययोजना नव्या स्वरूपात परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार सदर योजना सुधारित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या नावाने सुरू करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना योग्य ती मदत करणे हा मुख्य हेतू होय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनाचे वैशिष्ट्य 

1. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपाय योजना केली गेली आहे.
2. कोरडवाहू शेतकरी असल्यास त्याला नवीन विहिरीसाठी अनुदान मिळते.
तसेच विविध घटकांवरील पॅकेज कृषी स्वावलंबन योजना 2024 अंतर्गत दिले जाईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2024 चा लाभ 

सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार पॅकेज स्वरूपात अनुदान दिले जाते.

» नवीन विहीर पॅकेज : ज्या शेतकऱ्याला नवीन विहीर खोदणे व्यतिरिक्त पंपसंच , वीजजोडणी आकार सुक्ष्म सिंचन संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरींग सारख्या बाबी या पॅकेजमध्ये शेतकऱ्याला उपलब्ध करून दिले जातील.

» जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज : ज्या शेतकऱ्याला त्याची जुनी विहीर दुरुस्ती करणे तसेच पंपसंच जोडणी सूक्ष्म सिंचन संच व इनवेल बोअरिंग मध्ये सुधारणा करणे हेतू मदत मिळेल.

» शेततळ्यासाठी प्लास्टिक अस्तरीकरण पॅकेज :
शेतकरी मित्रांनो ग्रामविकास व जलसंधारण विभागांतर्गत राबविल्या जाणाऱ्या ‘मागील त्याला शेततळे’ या योजने अंतर्गत शेततळ्याचे काम पूर्ण केलेले आहे. त्याच अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना या पॅकेजचा लाभ घेता येईल. त्यामध्ये शेतकऱ्याला शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण पंपसंच, वीजजोडणी आकार व सूक्ष्म सिंचन संच या घटकांचा लाभ घेता येईल.

»  सोलार पंप जोडणी पॅकेज :
ज्या शेतकऱ्यास महावितरण कंपनीकडून सोलार पंप मंजूर झाला असेल त्या शेतकऱ्यास पंपसंच व विजजोडणी अनुज्ञेय अनुदानाच्या मर्यादेत लाभार्थीचा हिस्सा रक्कम महावितरण कंपनीस अदा करता येईल.

» इनवेल बोरिंग, पंपसंच, वीजजोडणी आकार :
ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच शासकीय योजनेतून विहीर घेतली असेल किंवा स्वखर्चाने विहीर बांधली असेल अशा शेतकऱ्यांना अनुदान देय राहील. तसेच सूक्ष्म सिंचन संच मध्ये ठिबक सिंचन व तुषार सिंचन या घटकांचा लाभ देखील अनुज्ञेय राहील.

               लाभाच्या बाबी           अनुदान मर्यादा रु.
  नवीन विहीर          250000/-
  जुनी विहीर दुरुस्ती          50000/-
  शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण          100000/-
  सोलर पंप जोडणी          30000/-
  इनवेल बोअरिंग          20000/-
  पंप संच          20000/- (upto 10HP )
  विज जोडणी आकार          10000/-
  सूक्ष्म सिंचन संच
  a). तुषार सिंचन          25000/-
  b). ठिबक सिंचन          50000/-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत किंवा शासनाच्या कोणत्याही योजनेतून ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी नवीन विहीर व जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेतला असेल अशा लाभार्थ्याव्यतिरिक्त इतर सर्व लाभार्थ्यांना नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती व शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण यापैकी एक घटकाचा व त्यासोबतच्या पॅकेजचा लाभ घेता येईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

”पीएम मोफत शिलाई मशीन योजना ”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना च्या अटी व पात्रता 

1. लाभार्थी हा अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकरी असला पाहिजे.

2. शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकार्‍याने दिलेले जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.

3. ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर या घटकाचा लाभ घ्यावयाचा आहे, त्यांच्यासाठी किमान जमीन धारणा 0.40 हेक्टर असणे आवश्यक आहे.

4. ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर व्यतिरिक्त इतर घटकांचा लाभ घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी किमान 0.20 हेक्‍टर शेतजमीन असणे आवश्यक.

5. सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्याकडे जास्तीत जास्त 6 हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक.

6. शेत जमिनीचा 7/12 व 8-अ चा उतारा असणे आवश्यक.

7. शेतकऱ्याचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला व शेतकऱ्याचे सर्व मार्गाने  मिळणारे वार्षिक उत्पन्न 150000/- रुपये पेक्षा जास्त नसावे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आवश्यक कागदपत्रे 

शेतकरी मित्रांनो सदर योजने अंतर्गत विविध घटकांतील पॅकेजचा लाभ घेण्यासाठी पुढील आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.

» नवीन विहीर 

1.  सक्षम प्राधिकारी याचे कडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.

2.  सातबारा व आठ अ उतारा तहसीलदार यांच्याकडील मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र.

3.  लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र स्टॅम्प पेपर.

4.  तलाठी चा सामायिक एकूण धरणाक्षेत्राबाबतचा दाखला.

5.  विहीर नसल्याचे प्रमाणपत्र.

6.  प्रस्तावित विहीर सर्वे नंबर नकाशा व चतु:सीमा.

7.  भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.

8.  कृषी अधिकारी यांचे क्षेत्रीय पाणी व शिफारस पत्र.

9.  गटविकास अधिकारी शिफारस पत्र.

10. जागेचा फोटो.

11. ग्रामसभेचा ठराव.

12. लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

13. लाभार्थ्याचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधार कार्डची संलग्न असणे आवश्यक आहे.

» जुनी विहीर

1.  सक्षम प्राधिकारी याच्याकडे अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र

2.  तहसीलदार याचे कडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र

3.  जमीन धरणेचा अद्यावत 7/12 व 8-अ उतारा

4.  ग्रामसभेचा ठराव

5.  तलाठी याचे कडील एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला

6.  विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र

7.  प्रस्तावित विहीर सर्वे नंबर नकाशा व चतुर सीमा

8.  लाभार्थीचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र

9.  गटविकास अधिकारी यांचे शिफारस पत्र

10. ज्या विहिरीवर जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोरिंग चे काम घ्यायचे आहे त्यावेळी चा कामा सुरू होण्यापूर्वी चा फोटो

11. अपंग असल्यास प्रमाणपत्र

» शेततळ्यास प्लास्टिक अस्तरीकरण/ वीज जोडणी आकार/ पंपसंच/सूक्ष्म सिंचन संच 

1. सक्षम प्राधिकारी याच्याकडील अनुसूचित जातीची जात प्रमाणपत्र

2. तहसीलदार यांच्याकडील मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र

3. जमीन धारण चा अद्यावत 7/12 दाखला व 8-अ चा उतारा

4. तलाठी यांच्याकडील एकूण धारणा क्षेत्र बाबतचा दाखला

5. ग्रामसभेची शिफारस

6. शेततळे असतीकरण अस्तरीकरण पूर्णत्वाबाबतचे हमीपत्र 500/-  स्टॅम्पवर

7. काम सुरू करण्यापूर्वी चा फोटो विद्युत कनेक्शन व विद्युत पंप संच  नसलेबाबत हमीपत्र

8. प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तकीच्या छायांकित प्रत व मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडून अंदाजपत्रक प्रति स्वाक्षरी करून घ्यावे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना Apply Online अर्ज प्रक्रिया

1.  योजने अंतर्गत शेतकऱ्यास ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

2. ऑनलाइन केलेल्या अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रे स्वसाक्षांकित छायांकित प्रति सह कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करावा.

3. सदर अर्ज कृषी अधिकाऱ्यामार्फत जिल्हास्तरावर नियमित छाननीसाठी पाठवला जाईल.

4. अंतिम निवड झालेल्या लाभार्थ्यास कृषी अधिकारी पंचायत समिती मार्फत कळवले जाईल निवड प्रक्रियेत महिला व अपंग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.

सारांश

जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

Leave a comment