Amrut Free Typing and Shorthand Course Yojana 2024 | अमृत फ्री टायपिंग व शाॅर्टहॅंड कोर्स योजना | निवडणुकीपूर्वी शिंदे सरकारची मोठी घोषणा

Amrut Free Typing and Shorthand Course Yojana काय आहे ?

Amrut Free Typing and Shorthand Course Yojana : मित्रांनो महाराष्ट्र सरकार अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी नवनवीन योजना यशस्वीरित्या राबविल्या जातात. जेणेकरून आथिर्कदृष्ट्या कमजोर कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. तसेच गरीब व आथिर्कदृष्ट्या कमजोर कुटुंबांतील पालकांना होणारा मानसिक त्रास कमी होईल.

यातच आता नवीन योजनेची सुरुवात महाराष्ट्र सरकार तर्फे राबविण्यात येणार आहे.ती म्हणजे फ्री टायपिंग आणि शाॅर्टहॅंड अभ्यासक्रम मोफत शिकण्याची संधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत महाराष्ट्र सरकारतर्फे करता येणार आहे. निवडणूकीपुर्वी मोठी खुशखबर टायपिंग आणि शाॅर्टहॅंड करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिंदे सरकारतर्फे देण्यात आली आहे.

Amrut Free Typing and Shorthand Course Yojana Key Points

   योजनेचे नांव   अमृत फ्री टायपिंग व शाॅर्टहॅंड अभ्यासक्रम योजना
   सुरू केली   महाराष्ट्र सरकार
   लाभार्थी   महाराष्ट्रतील विद्यार्थी
   लाभ   मोफत शिक्षण

 

RTE Maharashtra Lottery Result 2024

Amrut Free Typing and Shorthand Course Yojana चा उद्देश

  1. महाराष्ट्र सरकार मार्फत गरीब व आथिर्कदृष्ट्या कमजोर कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी विविध प्रकारच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. अशातच आता महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांना निवडणुकीपूर्वी मोठे गिफ्ट दिले आहे.
  2. या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना टायपिंग अभ्यासक्रम तसेच शाॅर्टहॅंड म्हणजेच स्टेनोग्राफीचा अभ्यासक्रमांत प्रवेश घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकार आर्थिक मदत करणार आहे.
  3. ग्रामीण भागातील तसेच शहरी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना या सारख्या अभ्यासक्रमातुन रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
  4. ज्या विद्यार्थ्यांना आवड आहे पण पैशामुळे शिक्षणापासून वंचित राहतात अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा नक्कीच फायदा होणार आहे.

Amrut Free Typing and Shorthand Course Yojana लाभ व पात्रता

  1. उमेदवार संबंधित परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संपूर्ण कोर्स चा खर्च त्याला दिला जाणार आहे.
  2. अमृत फ्री टायपिंग व शाॅर्टहॅंड अभ्यासक्रम योजना  फक्त अमृत संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आथिर्कदृष्ट्या कमजोर कुटुंबांतील उमेदवारांसाठी सुरू केली आहे.

मिळणारे अर्थसहाय्य
टायपिंग अभ्यासक्रम ६,५०० :-
जीसीसी – टीबीसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांला सहा महिन्यांचे कोर्स शुल्क ४८०० , प्रवेश शुल्क २०० , परीक्षा शुल्क १००० , सामग्री शुल्क ५०० रु. असे एकूण ६,५०० रु. मिळतील.

शाॅर्टहॅंड / स्टेनोग्राफी अभ्यासक्रम ५,३०० :-
लघुलेखन कोर्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांला सहा महिन्यांचे कोर्स शुल्क ३६००, प्रवेश शुल्क २००, परीक्षा शुल्क १००० , सामग्री शुल्क ५०० रुपये असे एकूण ५,३०० रुपये मिळतील.

संगणक टायपिंग संस्थाची लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अमृत फ्री टायपिंग व शाॅर्टहॅंड कोर्स योजना 2024 साठी आवश्यक कागदपत्रे 

  1. आधार कार्ड
  2. जातीचा दाखला / प्रमाणपत्र
  3. १० वी पास मार्कशिट
  4. १२ वी पास मार्कशिट
  5. शाळेचा दाखल्याची झेरॉक्स
  6. बॅंक पासबुक
  7. पासपोर्ट साईज फोटो
  8. फोन नंबर

amrut free typing and shorthand course yojana

Amrut Free Typing and Shorthand Course Yojana  साठी खालील अधिकृत संकेतस्थळला भेट द्या. https://mscepune.in/gcc/index_GCT.html

FAQ 

अमृत फ्री टायपिंग व शाॅर्टहॅंड कोर्स योजनेचा लाभ कसा घ्यावा ?
तुमच्या जवळच्या संगणक टायपिंग व शाॅर्टहॅंड टायपिंग संस्थेला भेट द्यावी व सविस्तर माहिती मिळवा.

 

 

Leave a comment