Sukanya Samridhi Yojana 2024 :
मित्रांनो मुलींच्या उज्वल भविष्यासाठी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. पालकांनी आपल्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी या योजनेमध्ये सहभागी व्हावे. मध्यमवर्गीय कुटुंब पालकांनी आपल्या मुलीच्या भविष्यासाठी व त्यांच्या शैक्षणिक गरजा तसेच त्यांच्या विवाह साठी मुबलक राशी जमा करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजने योजना एक उत्तम उदाहरण आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी सर्व पालकांना आपल्या मुलीच्या वयाच्या दहाव्या वर्ष पूर्ण होण्याअगोदर पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडावे लागते.
मित्रांनो ज्या पालकांना आपल्या मुलीच्या भविष्याच्या गरजा व खर्च खर्चाच्या चिंतेपासून मुक्त व्हायचे असेल त्या पालकांसाठी सुकन्या समृद्धी योजना चा लाभ घेण्यास हरकत नाही. सुकन्या समृद्धी योजनेबद्दल सर्व माहिती आपण या आर्टिकल मध्ये बघणार आहोत. सुकन्या समृद्धी योजना काय आहे, योजनेचे वैशिष्ट्य काय आहे, सुकन्या समृद्धी योजनेचे उद्दिष्ट तसेच पात्रता व आपण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया कशी असेल याबद्दल सर्व माहिती खाली सविस्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी तुम्हाला हा लेख संपूर्ण वाचावा लागेल.
सुकन्या समृद्धी योजना 2024 काय आहे ?
मित्रांनो श्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुकन्या समृद्धी योजनेची घोषणा आणि उद्घाटन करण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत मुलींच्या उच्च शिक्षणापासून ते लग्नापर्यंत होणाऱ्या खर्चापासून चिंतामुक्त होण्यासाठी पालकांनी या योजनेमध्ये अर्ज करावा. केंद्र सरकार अंतर्गत महिलांसाठी विशेषता मुलींसाठी विविध योजना सुरू केल्या गेल्या आहेत. त्याच धर्तीवर सुकन्या समृद्धी योजना आणखी एक नवीन महत्वकांक्षी योजना भारत सरकार राबवत आहे.
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत पालक आपल्या मुलीच्या नावे बचत खाते अंतर्गत प्रति महिना गुंतवणूक करू शकतात. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीच्या वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत जमा केलेल्या बचतीवर पालकांना 2024 या वर्षी 8.2% दराने व्याज दिले जाणार आहे.
Sukanya Samridhi Yojana 2024 Highlights
योजना तपशील :
योजनेचे नाव | सुकन्या समृद्धी योजना |
सुरू केली | केंद्र सरकार |
उद्देश्य | मुलांचे भविष्य सुरक्षित करणे |
लाभार्थी | 10 वर्षा आतील मुली |
लाभ | मुलींना वयाच्या 21 व्या वर्षी उच्च शिक्षण तसेच लग्न साठी होणाऱ्या खर्च साठी बचत |
अधिकृत संकेतस्थळ | https://indiapost.gov.in |
Sukanya Samridhi Yojana Details
खाते धारक | 0-10 वयोगटातील मुली |
खाते कोण उघडू शकतो | आईवडील |
खाते कुठे उघडावे | पोस्ट ऑफिस/मान्यताप्राप्त बँक |
किमान/कमाल गुंतवणूक | 250 ते 1.5 लाख |
चालू व्याजदर | 8.2% |
कर प्रणालीत फायदा | 80C अंतर्गत 1.5 लाख |
मॅच्युरिटी | खाते उघडल्यानंतर 21 वर्ष किंवा लग्न ठरल्यानंतर |
मिळणारी रक्कम | एक रकमी |
Sukanya Samridhi Yojana चे वैशिष्ट्य
- सुकन्या समृद्धी योजना मुख्यतः दहा वर्षातील वयोगटातील मुलींसाठी सुरू केली गेलेली आहे.
- पालक आपल्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी बचत खाते पोस्ट ऑफिस मध्ये उघडू शकतात.
- सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत पालक आपल्या मुलीच्या नावे प्रतिवर्ष कमीत कमी 250 रुपये ते 1.5 लाख रुपये जमा करू शकतात.
- ज्या पालकांना आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी जमा झालेल्या बचतीतून पैसे काढायचे असतील अशा पालकांना मुलीच्या 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जमा झालेल्या पैशांमधून 50 टक्के काढू शकतात. व उर्वरित रक्कम मुलीच्या वयाच्या 21 व्या वर्षी काढू शकतात.
- गुंतवणूकदार पालकांना सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 8.2% दराने व्याज दिले जाते.
- सुकन्या योजनेचा लाभ घेणाऱ्या पालकांना इन्कम टॅक्स अक्ट नुसार टॅक्स मध्ये सूट दिली जाते.
Sukanya Samridhi Yojana चा उद्देश
सुकन्या समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश हा मुलींचे भविष्य सुरक्षित करणे हा आहे. पालकांना होणाऱ्या मुलीच्या मुलींच्या भविष्याची चिंतेपासुन मुक्त करणे. मध्यमवर्गीय कुटुंबीयांसाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.
सुकन्या योजना मध्ये मध्यमवर्गीय कुटुंब आपल्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी बचत खाते पोस्ट ऑफिस मध्ये उघडू शकतात आणि गुंतवणूक करू शकतात.
योजनेअंतर्गत पालकांना टॅक्स मध्ये सूट देण्यात आली आहे.
Sukanya Samridhi Yojana Eligibility
- अर्जदार पालक भारतीय असणे अनिवार्य आहे.
- सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत पालक आपल्या दोन मुलींचा अर्ज करू शकतात.
- सुकन्या योजना मध्ये सहभागी होण्यासाठी मुलीचे वय 10 वर्षाच्या आत असणे आवश्यक आहे.
सुकन्या समृद्धी योजना साठी आवश्यक कागदपत्रे
- मुलीचा जन्म दाखला
- आईवडीलाचे आधारकार्ड/पॅनकार्ड
- अधिवास दाखला
- पोस्ट ऑफिस चे बॅंक पासबुक
- पासपोर्ट फोटो
Sukanya Samridhi Yojana 2024 चे खाते कसे उघडावे
- सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिस ला भेट द्या
- अर्ज करण्यासाठी अर्जाचा फॉर्म भरून अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रे सबमिट करावे.
- अशा प्रकारे सुकन्या समृद्धी योजना चा अर्ज प्रक्रिया करून तुम्ही तुमच्या मुलीचे बॅंक खाते उघडु शकतात.
Sukanya Samridhi Yojana Calculator
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत प्रतिमहीना 2000 रुपये जमा केल्यास
प्रतिमा 2000 रुपये. | 24000 रु. |
15 वर्ष पर्यंत. | 180000 रु. |
21 वर्षानंतर. | 329000 रु. |
मैच्युरीटी रक्कम | 509212 रु. |
FAQ
1). सुकन्या समृद्धी योजने मध्ये कोण अर्ज करु शकतो ? फक्त मुली |
2). सुकन्या समृद्धी योजनेचा 2024 वर्षासाठी व्याजदर काय आहे ? 8.2% |
3). सुकन्या समृद्धी योजने मध्ये मॅच्युरिटी रक्कम कधी मिळेल ? मुलीच्या वयाच्या 21 व्या वर्षी किंवा लग्नाच्या वेळी जे प्रथम येईल. |
1 thought on “Sukanya Samridhi Yojana 2024 | सुकन्या समृद्धी योजना | Registration, Apply Online”