Ladki Bahin Yojana App 2024
मित्रांनो महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये सरकार देणार आहे. या योजनेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी महिलांना सरकारी कार्यालयाच्या चकरा मारायची गरज नाही. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आता तुम्ही लाडकी बहीण योजना ॲपच्या माध्यमातून सुद्धा भरू शकतात. या ॲपचे नाव नारीशक्ती दूत असे ठेवण्यात आले आहे. मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दल आपण संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
Majhi Ladki Bahin Yojana 2024 काय आहे ?
महाराष्ट्र शासनाने राज्यातील माझ्या लाडक्या बहिणींना आर्थिक लाभ देण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना पंधराशे रुपयांचा मासिक लाभ दिला जाईल. या आर्थिक मदतीमुळे महिलांना त्यांच्या महिन्याभराच्या मासिक खर्चाचा सामना करण्यासाठी सोपी होईल महाराष्ट्र शासनाची माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील मुलींचे भविष्य सुरक्षित करण्याचा आणि मुलींच्या शिक्षणाचा विकास करण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून जास्तीत जास्त मुलींचा साक्षरता दर वाढण्यास मदत होईल. कुटुंबातील मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. राज्यातील इच्छुक महिला नारीशक्ती दूत ॲप वापरून लाडकी बहीण योजनासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
About Ladki Bahin Yojana App 2024
Majhi ladki bahin Yojana साठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नारीशक्ती दूत नावाचे ॲप सुरू केले आहे. त्यासाठी इच्छुक लोकांना प्ले स्टोर वरून Ladki behna scheme app तुम्ही सहज डाऊनलोड करू शकता. या ॲप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही घरबसल्या कुठलाही खर्च न करता ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.
Ladki bahin Yojana app highlights
ॲप नाव | ladki bahin Yojana app |
योजनेचे नाव | Majhi ladki bahin Yojana |
सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
लाभ | 1500 रुपये दरमहा |
लाभार्थी | महाराष्ट्रातील महिला |
Download App | Google Play Store |
Registration mode | online |
How to download Ladki Bahin Yojana App?
- सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर उघडा.
- सर्च बार मध्ये Nari Shakti Doot सर्च करा.
- Nari Shakti Doot app वर क्लिक करा.
- नंतर इन्स्टॉल या बटनावर क्लिक करा.
- ॲप डाऊनलोड झाल्यावर ओपन करा व रजिस्टर करा.
How to register on Ladki Bahin Yojana app ?
- सर्वप्रथम ॲप ओपन करा.
- रजिस्टर या बटनवर क्लिक करा.
- नवीन पेज ओपन झाल्या वर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेला दिसेल.
- फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती भरल्यावर मोबाईल नंबर वर OTP येईल OTP टाकून Verify करा.
- व्हेरिफिकेशन झाल्यावर सबमिट या बटन वर क्लिक करा.
How to Login On Majhi Ladki Bahin Yojana App ?
Nari Shakti Doot App वर लॉगिन करण्यासाठी खालील प्रमाणे प्रयत्न करा.
- सर्वप्रथम ॲप ओपन करा.
- लॉगिन या बटणावर क्लिक करा.
लॉगिन करण्यासाठी तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका. - नंतर लॉगिन बटनावर क्लिक करा व Logged in व्हा.
FAQ
1).लाडकी बहीण योजना अँप कसे डाऊनलोड करावे ? प्ले स्टोअर वर Nari Shakti Doot सर्च करून App डाऊनलोड करा |
2).लाडकी बहीण योजना कोणी सुरू केली ? लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे |
3).Nari Shakti Doot App कोणी सुरू केले ? महाराष्ट्र सरकार |